संकट काळात उत्सव साजरे करण्याचा भाजपला रोग : पटोले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय उपकरणांसह अन्य बाबींची मदत करण्याऐवजी लसीकरणाचा उत्सव साजरा करून मोदी सरकार नाहक वेळ वाया घालवत आहे.

संकट काळात उत्सव साजरे करण्याचा भाजपला रोग जडला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले, लसीच्या बाबतीत महाराष्ट्रावर अन्यायच झाला आहे असे सांगताना ते म्हणाले की आज महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गुजरातला मोठ्या प्रमाणावर लस पुरवठा करण्यात आल्याचे आकडेवारीनिशी सिद्ध झाले आहे.

विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्य सरकारांची कोंडी करून अपयशाचे खापर त्या राज्य सरकारवर कसे फुटेल यासाठीच मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत,असा आरोप त्यांनी केला.

देशभर कोरोना विषयक लसींचा तुटवडा निर्माण झालेला असताना मोदी सरकारने लसीकरणाचा उत्सव रविवारपासून देशभर सुरू केला आहे.

महाराष्ट्रासह देशातील अनेक लसीकरण केंद्रे लसी अभावी बंद असताना लसीकरणाचा महोत्सव साजरा कसा होऊ शकतो, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.

लसीकरणा अभावी बंद पडलेल्या केंद्रांच्या बाहेर कॉंग्रेसचे कार्यकर्ते थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा हे आंदोलन करणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पण देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून पाकिस्तानला मोफत लस दिली गेली आहे हा या बेजबाबदारपणा आहे. लसीच्या टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर लसीची निर्यात सरकारने बंद केली पाहिजे असेही पटोले यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24