अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- येथील माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व वृक्ष बँकेच्या माध्यमातून कोल्हार (ता. पाथर्डी) येथील तिर्थक्षेत्र कोल्हुबाई गडावर लावण्यात आलेल्या पाचशे वडांच्या झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करुन माजी सैनिकांनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे.
मागील वर्षी कोल्हुबाई गडावर महादेव मंदीर परिसरात भगवान शंकराच्या पिंडीच्या आकारात पाचशे वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. सदर झाडांचे संगोपन करुन जगविण्यात आली असून, ही वृक्ष बहरु लागली आहेत. या झाडांचा पहिला वाढदिवस मंदीर परिसरात 21 फुलझाडांचे रोपण करुन करण्यात आला.
यावेळी विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे, निवृत पोलिस अधिकारी तथा कवी-लेखक सुभाष सोनावणे, मा. सभापती संभाजीराव पालवे, सरपंच शोभाताई पालवे, शिवाजी पालवे, लक्ष्मण गिते, शंकर डमाळे, विष्णु गिते, आजिनाथ पालवे, सुरेश बडे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे,
महादेव शिरसाठ, अंकुश भोस, यादवराव पालवे, चंदु नेटके, संतोष पालवे, आजिनाथ पालवे, गोविंद पालवे, शहादेव पालवे, हरि जाधव, सोमा सानप, सैनिक बचत गटाच्या अनिता नेटके, सौ. जगताप, आरोग्य विभागाच्या सुनिता गर्जे, प्रशांत पालवे आदी उपस्थित होते.
विभागीय अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करुन, कोल्हुबाई गड लवकरच निसर्ग व पर्यटनाचे केंद्र म्हणून बहरणार असल्याचे सांगितले. शिवाजी पालवे यांनी कोल्हुबाई गडावर पिंडीच्या आकारात लावण्यात आलेल्या पाचशे झाडांचा हा भव्य प्रकल्प असून,
पिंडीच्या आकारात निसर्ग बहरणार आहे. येणार्या भाविकांना हे विलोभीनीय दृश्य लवकरच झाडांची वाढ झाल्यावर पहावयास मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंदिरात लक्ष्मण गिते व विजया गिते यांच्या हस्ते अभिषेक करुन पूजा करण्यात आली. गिते परिवाराने मंदिर परिसर व झाडांभोवती फुलांची आकर्षक सजावट केली होती.
आभार सरपंच शोभाताई पालवे यांनी मानले. जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व वृक्ष बँकेच्या माध्यमातून जिल्हाभर डोंगर रांगा, गड परिसर व तिर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी झाडांची लागवड केली जात आहे. यावर्षी देखील अनेक डोंगर माथ्यांवर झाडे लाऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी माजी सैनिकांनी घेतली आहे.