अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- शिवजयंतीचे जनक असलेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माळीवाडा येथील पुतळ्यासमोर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दिव्यांची रोषणाई करुन कृतज्ञता सोहळा पार पडला.
छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिव्यांची रोषणाई करण्यात आली.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजेंद्र दांगट, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, नगरसेवक सचिन जाधव, दीपक खेडकर, पंकज भुतारे, अमित पाटील, हरीश भामरे,
संचित निकम, गिरीश भामरे, तुषार कटारिया, धनंजय लोकरे, किरण चौरे, अजय बोरकर, राजू लोटके, वाकचौरे मामा, दत्ता रोकडे, महेश बागले, प्रशांत गायकवाड,
अक्षय गांधी, स्वप्नील कासार, आशिष कासार आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजेंद्र दांगट व त्यांचे सहकारी दरवर्षी या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करीत असतात.