Narendra Modi Mother Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या भेटीची नेहमीच चर्चा होत असते. त्यांची आई हिराबेन मोदी यांचा शनिवारी १९ जूनला शंभरावा वाढदिवस आहे.
यानिमित्त गांधीनगरमध्ये विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजिन करण्यात आले असून पंतप्रधान मोदीही त्यामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे गांधीनगरमधील एका ८० मीटर रस्त्याला पूज्य हिराबेन मार्ग असे नाव दिले जाणार आहे.
हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त वडनगरमध्येही मोठा उत्सव आयोजित केला आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर नामवंत कलाकारही उपस्थित राहणार आहेत.गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी सांगितले की, शहरातील एका पेट्रोलपंपाजवळील ८० मीटर रस्त्याला पूज्य हिराबेन मार्ग असे नाव दिले जाणार आहे.
यामाध्यमातून त्यांचे नाव येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविता येणार आहे.वडनगर येथील हाटकेश्वर मंदिरात पूजा होणार आहे. पावागढमध्ये ‘काली माता’ मंदिरात ध्वजारोहणही करण्यात येणार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात नवचंडी यज्ञ आणि सुंदरकांड पठण आणि संगीत संध्याचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मोदी यांच्या कुटुंबियांनी दिली.