PM Kisan : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिली आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, मिळणार इतके पैसे

Published by
Ahmednagarlive24 Office

PM Kisan : लवकरच सादर होणाऱ्या आर्थिक बजेटकडे शेतकऱ्यांचेही लक्ष आहे. शेतकऱ्यांना अशी आशा आहे की याबजेटमध्ये लाभ घेत असलेल्या पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ होईल. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते.

दरम्यान मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार या योजनेच्या रकमेत वाढ करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या योजनेचा देशातील अनेक शेतकरी लाभ घेत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते दिले आहेत.

पीएम किसान योजना

शेतकऱ्यांना सध्या पीएम किसान योजनेंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. अशातच आता अशी चर्चा सुरु आहे की शेतकऱ्यांना 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये योजनेंतर्गत दरवर्षी दिले जाऊ शकतात. सूत्रांच्या मतानुसार या योजनेतील रकमेची वाढ एका वर्षासाठी असू शकते आणि त्यानंतर त्याचा आढावा घेतला जाणार आहे.

याबाबत एका एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, “पीएम-किसान रकमेतील वाढ उपभोग आणि ग्रामीण मागणीला समर्थन देऊ शकते. जरी रक्कम दुप्पट करण्याच्या सूचना असल्या तरी, महसूल खर्च आणि महागाईचा दबाव रोखण्यावर केंद्र सरकारचे लक्ष केंद्रित केल्याने वाढ मर्यादित होऊ शकते. जरी रक्कम वाढली तरी सरकारला सुमारे 22,000 कोटी रुपयांचा वार्षिक अतिरिक्त खर्चावे लागणार आहेत.

फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु झालेल्या या योजनेंतर्गत, प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) लिंक्ड बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक रुपये 6000 जमा होतात. जेव्हा या योजनेची सुरुवात झाली तेव्हा लाभार्थ्यांची संख्या 31 दशलक्ष होती, परंतु, आता त्यात वाढ होऊन ती आता 110 दशलक्ष इतकी झाली आहे.

सरकारने सध्याच्या आर्थिक वर्षात 68,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी वाटप केले आहे.इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मूल्यांकनानुसार, पीएम किसान ने कृषी निविष्ठा, दैनंदिन वापर, शिक्षण, आरोग्य आणि इतर आपत्कालीन खर्च खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांच्या तरलतेची कमतरता दूर करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office