Central Railway Apprentice Recruitment : तरुणांना मोठी संधी ! मध्य रेल्वेमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरमध्ये 2422 पदांसाठी भरती; करा लगेच अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Railway Apprentice Recruitment : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय रेल्वेने तुम्हाला एक संधी आणली आहे. यामुळे तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार करू शकता.

दरम्यान, मध्य रेल्वेने 2422 शिकाऊ पदांसाठी तपशीलवार अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 15 डिसेंबर 2022 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, भरतीशी संबंधित माहिती वाचा, त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करा.

शिकाऊ उमेदवारांच्या 2422 पदांसाठी भरती

मुंबई क्लस्टर – 1659 पदे
भुसावळ क्लस्टर-418 पदे
पुणे क्लस्टर – 152 पदे
नागपूर क्लस्टर – 114 पदे
सोलापूर क्लस्टर – 79 पदे

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI/NCVT प्रमाणपत्र असावे.

अर्जाची तारीख

अर्ज करण्याची तारीख – 15/12/2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15/01/2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत

अर्ज फी भरण्याची तारीख – 15/01/2023

अर्ज शुल्क

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी: रु 100
SC/ST/PH श्रेणीसाठी: कोणतेही शुल्क नाही.
सर्व श्रेणीतील महिलांसाठी: कोणतेही शुल्क नाही.

डेबिट/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग/इतर मोडद्वारे परीक्षा शुल्क भरा.

वय मर्यादा

उमेदवाराचे किमान वय – 15 वर्षे

उमेदवाराचे कमाल वय – 24 वर्षे

रेल्वे रिक्रूटमेंट सेल RRC सेंट्रल रेल्वे अ‍ॅक्ट अप्रेंटिस नियम 2023-24 नुसार, अतिरिक्त वयात सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिकृत अधिसूचना पहाण्याचा सल्ला दिला जातो.

निवड कशी होईल?

उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करायचा?

उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15/01/2023 आहे.