केंद्रीय पथकाचा इशारा, कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर’ न ठेवल्यास तिसऱ्या लाटेचा धोका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :-कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत. नागरिकांकडून कोविड ॲप्रोपिएट बिहेवियरचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे.

त्याचे पालन न झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा इशारा केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी वर्धा येथे दिला. मास्क हे कोरोना टाळण्यासाठीचे सर्वोत्तम औषध आहे. दक्षता त्रिसूत्रीबाबत वारंवार सूचना देत राहाव्यात.

दक्षता त्रिसूत्री ही जीवनशैलीचा भाग व्हावी. प्रशासन व आरोग्य यंत्रणा सांघिक भावनेतून कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहे.

असेच टीमवर्क ठेवावे, असे निर्देश पथकाने दिले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य पथकाने गुुरुवारी सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थित जिल्हा कोविड रुग्णालयाची पाहणी केली.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ.अमितेश गुप्ता व डॉ. संजय राय यांचा या पथकात समावेश आहे. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाकडून कोरोना उपाययोजनांबाबत बैठकीद्वारे माहिती घेतली.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पंडा, पालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी नवाल यांनी सादरीकरण केले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना उपाययोजनांत कार्यान्वित झालेली रुग्णालये,

विलगीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील व्यवस्था, ऑक्सिजन व्यवस्था, लसीकरण आदी विविध बाबींची माहिती पथकाला दिली.

पथकाने जिल्हा कोविड रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्टाफशी चर्चा केली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी भूषण व त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पथकाने समता कॉलनीतील कंटेनमेंट झोनला भेट देऊन पाहणी केली,

तसेच महापालिकेच्या सुदामकाका देशमुख सभागृह स्थित गृह विलगीकरण नियंत्रण कक्षालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. लसीकरण केंद्रे, ग्रामीण भागातील यंत्रणा आदींचीही पाहणी पथकांकडून होणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24