केंद्राची मोठी घोषणा ! 80 कोटी जनतेला मे, जूनमध्ये मोफत अन्नधान्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशातील 80 कोटी लोकांना दोन महिन्यांसाठी मोफत रेशन देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे आणि जूनमध्ये 5 किलो धान्य लाभार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे. या कामासाठी भारत सरकार एकूण 26 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. त्यातून करोना फैलाव रोखण्यासाठी बहुतांश राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब, गरजूंना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.

ती बाब ध्यानात घेऊन सरकारने दिलासादायक पाऊल उचलले आहे. करोना संकटामुळे मागील वर्षी तीन महिन्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली.

त्या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा अतिरिक्त 5 किलो गहू आणि तांदूळ तसेच 1 किलो डाळ उपलब्ध करण्यात आली. त्या योजनेची मुदत नंतर मागील वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.

आता त्या योजनेंतर्गत पुन्हा मोफत अन्नधान्य वाटप होणार आहे. अर्थात, यावेळच्या वाटपात डाळीचा समावेश नसेल. आता पुन्हा एकदा देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या तडाख्यात आहे.

अनेक राज्यात आंशिक व संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले गेले आहेत. हे लक्षात घेता सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्णा योजनेंतर्गत दोन महिन्यांचे मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24