चक्क सरपंचांनी केली ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी चक्क सरपंच यांनीच केली आहे. ग्रामसेवक मनमानी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याबाबत चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे यांनी म्हटले, की ग्रामसेवकांच्या मनमानीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. महत्वाच्या दाखल्यांसाठी त्यांची दिवसभर वाट पाहावी लागते.

वारंवार ग्रामपंचायतीत खेटे मारण्याची वेळ येत असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत. ग्रामसेवकांकडे दोन गावांचा कारभार आहे. गावातील नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता मी दुसऱ्या ग्रामपंचायतमध्ये असल्याचे ते नेहमी सांगतात.

सतत पंचायत समितीमध्ये काम असल्याचे कारण सांगतात. त्यामुळे येथील नागरिकांची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे त्यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी, अशी मागणी हारदे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पांडू लाटे यांनीही ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24