चाणक्य सांगतात : ज्या घरात नवरा बायकोंचे भांडणं होत राहतात….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

चाणक्य सांगतात ज्या घरात पती पत्नी सामंजस्याने राहतात, एकमेकांना समजून घेतात, एकमेकांचा आदर करतात, एकमेकांच्या आवडी निवडी जपतात अशा घरात लक्ष्मी कायम वास करते.

पण ज्या घरात पती पत्नी सारखे भांडत असतात एकमेकांना टचके टोमणे मारतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून घटस्फोटाची भाषणे करतात अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही.

अशा घरात पती पत्नीचे सामंजस्य नसल्यामुळे दोघे पण आनंद बाहेर शोधतात. बऱ्याचदा नवरा दारूच्या आहारी जातो आणि बायको महागड्या गोष्टींच्या मागे जाते.

पण आपले जीवन हे आनंदासाठी चालले आहे आणि घरात आनंद भेटत नसल्यामुळे दोघेपण आनंद बाहेर शोधतात आणि मग यांचे सगळे पैसे तिथेच खर्च होतात.

दोघांच्या अशा वागणुकीमुळे मुलांवर संस्कारसुद्धा नीट होत नाही. त्या मुळे अशा घरांवर लक्ष्मी कधीच टिकत नाही.

त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी किंवा पैसे टिकवायचा असेल तर नवरा बायकोने एकमेकांची माने समजून घेतली पाहिजेत. समाधानी राहील पाहिजे तरच लक्ष्मी तुमच्या घरी टिकेल.

अहमदनगर लाईव्ह 24