अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पुढील तीन ते चार दिवसांत मध्य महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार निकोबार बेटावर मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज अत्यंत खरा ठरला आहे.
शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सूनने हजेरी लावली आहे. तर, पुढील सात दिवसांत म्हणजेच दरवर्षी प्रमाणे 1 जून रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची
माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि कोकण जिल्ह्यात काही ठिकाणी वेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे