अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन-तीन तासांत राज्यातील रायगड, ठाणे , मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे.

याबाबतची माहिती हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिली आहे. आज सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी पालघर-ठाणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग विदर्भ या ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच ढग दाटलेले दिसून येत आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या नागपूर शाखेनं दिलेल्या माहितीनुसार वर्धा,इथे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर आणि चंद्रपूर येथे काही ठिकाणी गडचिरोली, यवतमाळ,वाशीम, भंडारा विदर्भातील अमरावती येथील काही ठिकाणी गडगडाटी वादळ आणि पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे व मेघगराजनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर पासून कोटा, गया, कोलकता ते ईशान्य बंगालच्या उपसागरात पर्यंत विस्तारलेला आहे.

पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे तर बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनार्‍यालगत समुद्रसपाटीपासून 5.8 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.