चंद्रकांत दादा म्हणाले…राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांना केंद्रित करत पक्षातील पदधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

नुकतेच भाजप समर्थ बुथ अभियान नगर दक्षिणची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात. यासाठी आतापासून बुथनिहाय बांधणी करण्याचे आदेश दिले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देत, राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या अनागोंदी कार्यपद्धतीमुळे जनता त्रस्त झाली आहे.

यामुळे कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात. त्यामुळे भाजप निवडणुकीसाठी सक्षम होण्यासाठी प्रत्येक बुथची बांधणी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले.

दरम्यान या आयोजित बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे, रवी अनासपुरे प्रा. भानुदास बेरड, आ. मोनिकाताई राजळे, शिवाजीराव कर्डिले याप्रमुख नेतेमंडळींसह लक्ष्मण सावजी,

युवा मोर्चाचे अध्यक्ष सत्यजित कदम, बाळासाहेब महाडीक, दिलीप भालसिंग, प्रसाद ढोकरीकर, युवराज पोटे, पक्षाचे उपाध्यक्ष, चिटणीस, सरचिटणीस, मंडल अध्यक्ष बूथ संयोजक व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24