अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- भाजपमध्ये जुन्या नेतेमंडळींना डावलण्यात आल्याने भाजप पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नुकतेच पंकजा मुंडे यांनी देखील त्यांची जाहीर नाराजी एका सभे दरम्यान बोलून दाखवली होती.
यातच आता भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बाहेर असलेले विनोद तावडे यांना नव्याने संधी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल.
पंकजाताईंना संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यामुळे भविष्यात पंकजा मुंडे यांच्याकडे देखील महत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते असे दिसून येत आहे.
भाजपचे नेते विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विनोद तावडे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना संधी देण्याबद्दल भाष्य केलं. पंकजा मुंडे यांनी जे विधान केले. त्याचा माध्यमे अर्थ लावतात, तसं काही नाही.
त्यांना संघटनेची जबाबदारी आहे. चुकीचा अर्थ लावू नका. चंद्रशेखर बावनमुळेंना दोन वर्षांनी संधी मिळाली, इतरांनाही मिळेल. पंकजाताईंना संधी मिळेल, वर्षभरात खूप स्कोप आहे, असं पाटील म्हणाले.