चंद्रकांतदादा म्हणतात, राज ठाकरेंच्या भेटीत फक्त हाय, हॅलोच झालं..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी खूप जुने मित्र आहोत. आम्ही दोघेही विद्यार्थी चळवळीतील आहोत. मी निघालो तेवढ्यात त्यांच्या गाड्या दिसल्या.

त्यांना मी नमस्कार केला. बाकी काही नाही. आमच्यात दहा-पंधरा मिनिटं चर्चा झाली हे खरं आहे. पण दोन तास चर्चा होण्याइतपत आमचे संबंध आहेत. आजच्या भेटीत फक्त हाय, हॅलोच झालं, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी सांगितलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज सकाळी नाशिकच्या विश्रामगृहाच्या दारातच भेट झाली. राज यांच्या वाहनांचा ताफा येत असताना चंद्रकांत पाटील यांचा ताफा विश्राम गृहाबाहेर जात होता.

त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी गाडीतून उतरून राज यांना नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विश्रामगृहाबाहेरच 15 मिनिटं चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे हाताची घडी घालून उभे होते. तर चंद्रकांतदादा त्यांना हातवारे करून काही तरी सांगत होते. राज हे सर्व काही गंभीरपणे ऐकत होते.

अनेकवेळा राज हे चंद्रकांतदादांच्या बोलण्यावर मान डोलवतानाही दिसत होते. दोघांचीही बॉडी लँग्वेज खूप काही सांगत होती. यावेळी दोन्ही नेत्यांशिवाय कोणीच नव्हते. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही. तुम्ही काही तरी सांगत होता आणि राज ठाकरे ऐकत होते. त्यांना नेमकं काय सांगत होता?,

असा सवाल चंद्रकांतदादांना करताच ते फक्त हसले. बरेच दिवस झाले भेटलो नाही, असं मी त्यांना म्हणत होतो. ते म्हणाले, मुंबईत कधी येतोस. आता पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाणार आहे. मुंबईत भेटतो त्यांना. आम्ही विद्यार्थी चळवळीत होतो.

40-42 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. त्यानंतर भेट झाली नाही. आम्ही नाशिकमध्ये असूनही आमची भेट झाली नव्हती. आज झाली. तासभर भेटलंच पाहिजे, असं काही नाही, असंही त्यांनी सांगितले. राजकारण आणि समाजकारणात दोस्ती वेगळी आणि व्यवहार वेगळा असतो. व्यवहारात आमचे निर्णय राज्याची टीम घेत असते.

मी राज्याचा अध्यक्ष आहे. पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, असं सांगतानाच नाशिक निवडणुकीवर एका शब्दानेही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अहमदनगर लाईव्ह 24