ताज्या बातम्या

Voter ID : फक्त एका क्लिकवर बदला वोटर आईडीवरील फोटो , पहा संपूर्ण प्रोसेस

Published by
Ahmednagarlive24 Office

Voter ID : मतदान करण्यासाठी ओळखपत्र खूप महत्त्वाचे असून त्याचसोबतच तुमचे मतदार यादीत नाव असावे लागते. परंतु, जर तुमच्याकडे अजूनही ओळखपत्र नसेल तरी काळजी करू नका.यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

अनेकांचे याच मतदान ओळखपत्रावरील फोटो चुकीचा येतो. जर तुमचाही फोटो चुकीचा आला असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण तुम्ही आता फक्त एकाच क्लिकवर हा फोटो बदलू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही हे काम करू शकता.

फोटो बदलण्यासाठी तुम्हाला http://www.nvsp.in

या मतदार पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला नोंदणी करून लॉगिन करावे लागणार आहे. आता होमपेजवर तुम्हाला Personal Details मध्ये Correction चा पर्याय निवडावा लागणार आहे.

त्यानंतर तुम्हाला आता फॉर्म 8 चा पर्याय निवडावा लागणार आहे. येथे तुम्हाला तुमची भाषा निवडून तुम्हाला सर्व आवश्यक माहिती फॉर्ममध्ये टाकावी लागणार आहे.

त्यात आवश्यक तपशील प्रविष्ट केल्यानंतर, खाली स्क्रोल करून तेथे सुधारित फोटोचा पर्याय निवडा. यानंतर, browse वर क्लिक करून तुम्हाला जो फोटो टाकायचा आहे तो निवडा.

आता फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकून शेवटी सबमिट पर्याय निवडावा लागेल. या सोप्या प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही मतदार ओळखपत्रावरील तुमचा फोटो सहज बदलला जाईल.

Ahmednagarlive24 Office