सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या आता कशी आणि किती पेन्शन मिळेल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अलीकडेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनशी संबंधित नियम बदलले आहेत.

या नवीन नियमानुसार, एका केंद्रीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्यांना आर्थिक मदत मिळेल. यामध्ये पेन्शनच्या पैशातील 50 टक्के रक्कम आश्रितांना दिली जाईल. पेन्शनमधील या महत्त्वाच्या बदलांबद्दल जाणून घेऊयात –

आश्रित व्यक्तींना लाभ मिळतील :- नवीन नियमानुसार, सरकारी कर्मचाऱ्याच्या आश्रितांसाठी पेन्शनसाठी 7 वर्षांच्या सर्विस ची अट रद्द करण्यात आली आहे. आता जर सर्विस ची 7 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर पेन्शनच्या 50 टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला दिली जाईल. म्हणजेच आता सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पेन्शनच्या अटी रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये या अटीमुळे कुटुंबातील सदस्यांना पेन्शनचा लाभ मिळू शकला नाही.

सरकारने महागाई भत्ता वाढवला :- प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता पूर्ववत केला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत सध्याच्या 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आली आहे. हे नवीन दर 1 जुलै 2021 पासून लागू होतील.

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना लाभ :- वित्त मंत्रालयाने एप्रिल 2020 मध्ये कोरोना संकटामुळे केंद्र सरकारचे 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यातील वाढ थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना 30 जून 2021 पर्यंत DA चा लाभ मिळाला नाही. आता सुमारे 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल. यामुळे सरकारचा खर्च सुमारे 34,401 कोटी रुपयांनी वाढेल.