केंद्राच्या महागाईच्या धक्याला आंदोलनाच्या माध्यमातून चपराक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  देशात कोरोनाचा काळ सुरु असताना आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागते आहे.

यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात केंद्र सरकारच्या विरुद्ध प्रचंड द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला गॅस सिलेंडरचा दर 25 रुपयांनी वाढवला आहे.

केंद्र सरकार एकामागे एक महागाईचे धक्के देत असल्याच्या निषेधार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन केले.

इंधनाची दरवाढ मागे घ्यावी या मागणीचेे निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आले. दरम्यान राष्ट्रवासि काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे,

देशातील नागरिक करोना महामारीचा सामना करत असताना नागरिकांना आधार द्यायचे सोडून केंद्र सरकार वारंवार महागाई मध्ये वाढ करून सर्वसामान्यांना चटके देत आहे. यात जनता होरपळून निघत आहे.

गेल्या दीड वर्षातल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत व ज्यांचे रोजगार आहेत त्यांच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला घरखर्च कसा चालवायचा? असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडला असताना महागाईमुळे नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24