अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
यातच असाच एक प्रकार नुकताच जिल्ह्यात घडला आहे. माहेरून पाच लाख रुपये आणले नाही म्हणून ३६ वर्षीय विवाहित तरुणीला मारहाण करणाऱ्या पतीसह आठ जणांविरुद्ध श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली. माझे पती यांचे मेनरोडवर सराफा दुकान आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पतीसह सासू-सासरे, ननंद यांनी मला मारहाण करून माहेरुन पाच लाख रुपये आण, असा तगादा लावला होता.
या त्रासाला कंटाळून अखेर पोलिस स्टेशन गाठले. याप्रकरणी रामकिशन दत्तात्रय माळवे (पती), दत्तात्रय बापूराव माळवे (सासरा), चंद्रकला दत्तात्रय माळवे (सासू), माया प्रशांत सूर्यवंशी (नणंद), चित्रा गणेश उदावंत, योगेश यशवंत उदावंत, (सर्व वार्ड नंबर सात, श्रीरामपूर),
छाया संजय डहाळे, संजय नरहरी डहाळे (रा. पुणे) या आठ जणांविरुद्ध श्रीरामपूर गुन्हा दाखल केला. दरम्यान विशेषबाब म्हणजे गुन्हा दाखल झालेला असतानाही अद्यापही कुणाला अटक का नाही, या विषयी तक्रारदार पिडीत महिलेने नाराजी व्यक्त केली आहे.