विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  राहुरी | चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ करणाऱ्या नवरा व सासू सासऱ्या विरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

आशा राजू कांबळे (रा. राहुरी) यांचा विवाह १९९३ मध्ये चिचोंडी पाटील येथील राजू किसन कांबळे यांच्याशी झाला होता. माहेरहून तीन लाख रुपये आणावेत, यासाठी त्यांचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरू केला.

माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळीला दीड लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर देखील पैशाची मागणी होऊ लागली.

त्यामुळे विवाहितेला घरातून हाकलून देण्यात आले. यावरून आशा कांबळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात पती राजू किसन कांबळे,

सासू हौसाबाई किसन कांबळे व सासरे किसन हरिभाऊ कांबळे (सर्व चिंचोडी पाटील, ता. नगर) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार सुरेश बनसोडे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24