अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील धामोरी येथे एका नवविवाहितेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिल्याची घटना घडली आहे.
याबाबत सोनाली सतीश दाणे (वय २१) रा. धामोरी ता. नेवासा हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू – सासऱ्यांसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे पती सतीश राजेंद्र दाणे, सासू राहीबाई राजेंद्र दाणे, सासरा राजेंद्र भानुदास दाणे, भाया संदीप राजेंद्र दाणे चौघेही रा. धामोरी ता. नेवासा तसेच नणंद रेणुका रवींद्र तागड व नंदाई रवींद्र तागड दोघे रा. टोका ता. नेवासा याबाबत अधिक माहिती अशी कि,
फिर्यादीने फिर्यादीत म्हण्टले आहे कि, ८ मे २०२१ रोजी सतिश राजेंद्र दाणे रा. धामोरी ता. नेवासा याचेशी विवाह झाला. सासरी नांदत असताना लग्नानंतर १५ दिवसांनी ते २२ सप्टेंबरपर्यंत आरोपी यांनी संगनमताने तूला स्वयंपाक नीट करता येत नाही. तू पटत नाही.
माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करुन धमकी देवून वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला व घरातून हाकलून दिले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.