अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- धान्य घेऊन जाणारे चार ट्रक संशयित रित्या आढळून आल्याने अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हि वाहने ताब्यात घेतले होती.
राजूर पोलिसांनी या चार जणांविरोधात अत्यावश्यक वस्तू कायदा नुसार गुन्हा दाखल करून जवळपास 53 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाणे समोरच पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे पथकासह गाड्याची तपासणी करत असतानाच रेशनिंगचे धान्य भरलेले चार ट्रक तपासणी करून ताब्यात घेतल्या होत्या.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी हौशीराम दिनकर देशमुख (रा. केळुंगण ता. अकोले), साई संदेश धुमाळ (रा. धुमाळवाडी, ता. अकोले), योगेश राजेंद्र धुमाळ,
(रा. अकोले) व अशोक हिरामण देशमुख (रा. केळुंगण, ता. अकोले) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्क पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहे.