अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राहूरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात सचिन दत्तू शिंदे या तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सचिन दत्तू शिंदे या तरुणाने राहूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, दि २७ मार्च रोजी माझा चुलत भाऊ संदीप शिंदे यांच्या दूध डेअरिवर वसंत रावसाहेब कवाणे हा तेथे आला असता त्यांच्यात वाद होऊन ते आपापसात मिटले होते.
परंतु त्याचा राग मनात धरून वसंत रावसाहेब कवाणे, नागेश रावसाहेब कवाणे, संतोष वसंत कवाणे यांनी एकत्रित येऊन माझा चुलत भाऊ संदिप शिंदे यास शिवीगाळ करू लागले. तेव्हा मी त्यांना समजून सांगितले असतं मलाही मारहाण करण्यात आली.
तसेच माझे वडील दत्तू शिंदे , भाऊ किरण शिंदे यांनाही नागेश कवाणे, संतोष कवाणे यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून दुःखापत केली.
दरम्यान राहूरी पोलीस ठाण्यात सचिन दत्तू शिंदे याने दिलेल्या फिर्यादीववरून वसंत कवाणे, नागेश कवाणे व संतोष कवाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.