अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- काही दिवसांपूर्वीच नगर अर्बन बँकेतील शेवगाव येथील निवृत्त शाखा व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आता पतीला अर्बन बँकेत नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले, मात्र नोकरी लावली नाही.
आणि घेतलेल्या पैशाचा तगादा केला असता संबंधित महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन, तिचा विनयभंग केल्यावरुन शेवगाव नगरपरीषदेचे नगरसेवक कमलेश गांधी यांच्यासह चार जणांविरुध्द शेवगाव पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी व विनभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१३ मध्ये ललिता तापडीया व कमलेश गांधी यांनी माझ्या पतीस अर्बन बँकेत नोकरीला लावून देतो. असे म्हणून माझ्या सासूकडे १० लाख रुपयांची मागणी केली. त्यातील साडेपाच लाख रोख घेतले होते. उर्वरीत रक्कमेसाठी तीन कोरे धनादेश घेतले होते. त्यानंतर पतीला नोकरीस न लावल्याने आमच्यात वाद झाले.
त्यानंतर ललिता तापडीया हीने माझ्या पतीविरुध्द धनादेश न वटल्याचा गुन्हा न्यायालयात दाखल केला. दि.१५ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान मी घरात एकटीच असतांना कमलेश गांधी, ललिता तापडीया, जगदीश तापडीया, शरद जोशी यांनी माझ्या घरी येवून मला जातीवाचक शिवीगाळ केली.
तुम्हाला जास्त झाले काय, तमचा खून करु असे कमलेश गांधी, शरद जोशी, जगदीश तापडीया म्हणू लागले. त्यावर ललिता तापडीया हीने माझ्या केसाला धरुन ओढत माझ्या तोंडावर चापट मारुन आमच्या नादाला लागू नकोस असे म्हणत आम्ही घरासकट तुम्हाला जाळून टाकू तसेच जातीवाचक शिवीगाळ केली.
जगदीश तापडीया व गांधी यांनी मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करु लागले. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. दरम्यान गुन्हा दाखल होत नसल्याने पिडीत महिला व तिचे कुटूंबीय दोन दिवसांपासून पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसले होते.