Cheap smartphone : स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी ! फक्त 2,424 रुपयांमध्ये खरेदी करा OnePlus चा ‘हा’ 5G स्मार्टफोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheap smartphone : तुम्हीही स्वस्तात मस्त स्मार्टफोन (smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अलीकडेच OnePlus कंपनीने एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 49,999 आहे. तरीही तुम्ही हा स्मार्टफोन 2,424 मध्ये खरेदी करू शकता. 

OnePlus ने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 10T भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन मजबूत कॅमेरा सेटअप आणि वायरलेस चार्जिंगसह येतो. यात फास्ट चार्जिंगसह अनेक फिचर्स आहेत.

Amazon वर या मोबाईलची किंमत 49,999 रुपये असली तरी आज तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने OnePlus चा हा नवीनतम स्मार्टफोन २५०० रुपयांपेक्षा कमी खर्च करून घरी आणला जाऊ शकतो.

Amazon वर लिस्ट केलेल्या या फोनला 49999 रुपयांच्या किमतीत 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. समोरच्या बाजूला अमोलेड पॅनल देण्यात आला आहे. बायोमेट्रिक अनलॉक प्रणालीच्या रूपात, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10T च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. हे 120 Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येते. तसेच, यात 2412 X 1080 पिक्सेल रिझोल्यूशन दिले आहे. यामध्ये 10 बिट कलर डेप्थ वापरण्यात आली आहे. हे HDR 10 Plus ला सपोर्ट करते.

OnePlus 10T रॅम आणि प्रोसेसर

OnePlus 10T च्या रॅम आणि प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट वापरण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यात 4800 mAh बॅटरी आहे, जी 150 वॅट सुपर वूक चार्जिंगसह सुसज्ज आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

OnePlus 10T कॅमेरा सेटअप

OnePlus 10T च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, बॅक पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सेल कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमेरासह Sony IMX 766 सेन्सर आहे, जो 120 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू कॅप्चर करू शकतो. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे. 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 10T वर काय डील आहे

Oneplus 10T Amazon वरून सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी करता येईल. Amazon वर दिलेल्या माहितीनुसार, अनेक बँका या मोबाईलवर सुलभ हप्त्यांचा पर्याय देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया २४ महिन्यांच्या हप्त्याचा पर्याय देत आहे.

ज्यामध्ये प्रत्येक महिन्यासाठी २४०१ रुपये भरावे लागतात. यावर 14 टक्के व्याजही आकारण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत या 49,999 रुपयांच्या फोनची किंमत 57,614 रुपये असेल.