Cheapest Reliance Jio Plan: रिलायन्स जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवगेळ्या रिचार्ज प्लॅन मार्केटमध्ये सादर करत असते. तुम्ही देखील जिओ ग्राहक असला तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला जिओचे काही स्वस्तात रिचार्जबद्दल माहिती देणार आहोत. ज्याचा लाभ तुम्हाला रिचार्ज करताना होणार आहे. जिओच्या या रिचार्जमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा देखील मिळणार आहे. चला तर जाणून घ्या या रिचार्जबद्दल संपूर्ण माहिती.
419 रुपयांमध्ये 28 दिवसांसाठी 3GB दररोज डेटा
जिओच्या 419 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही एका महिन्यात 84 GB डेटाचा लाभ घेऊ शकता.
1199 रुपयांमध्ये 84 दिवसांसाठी 3GB दररोज डेटा
जिओचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे जो दररोज 3GB डेटाचा लाभ देतो. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये, मोफत अमर्यादित कॉलिंगसह, तुम्हाला दररोज 100 एसएमएसचा लाभ देखील मिळतो. या प्लॅनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा 1199 रुपयांचा प्लान आहे आणि ग्राहक 84 दिवसांसाठी यामध्ये उपलब्ध फायदे घेऊ शकतात.
जिओ अॅप्सची मोफत सबस्क्रिप्शन
यासोबतच यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. याशिवाय कंपनी दररोज 100 एसएमएस देखील देते. यासोबतच Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud सारख्या Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.
तुम्ही असे रिचार्ज देखील करू शकता
जर तुम्ही देखील जिओ वापरकर्ते असाल आणि तुमचा डेटा वापर जास्त असेल तर आम्ही तुम्हाला सांगूया की जिओचा हा रिचार्ज प्लान रिलायन्स जिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि माय जिओ मोबाइल अॅपवरून डाउनलोड केला जाऊ शकतो.
हे पण वाचा :- Viral Video : बाबो ! क्रूझमधून समुद्रात पडला प्रवासी अन् 15 तासांनंतर घडलं असं काही .. पाहा व्हिडिओ