Best Smartwatch under 2000 : भारीच की..! 2,000 रुपयांपेक्षा स्वस्तात मिळत आहेत ही 5 स्मार्टवॉच, पहा यादी

Best Smartwatch under 2000 : आजकाल अनेकजण स्मार्टवॉच घालत आहेत. जर तुम्हीही कमी बजेटमध्ये चांगले स्मार्टवॉच घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कारण काही स्मार्टवॉच तुम्ही 2,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. लेटेस्ट फीचर्स असणारी ही स्मार्टवॉच आहेत. त्यामुळे स्वस्तात चांगले स्मार्टवॉच खरेदी करण्याची संधी सोडू नका.

आज आम्ही तुमच्यासाठी अशाच 5 स्मार्टवॉच घेऊन आलो आहोत, जे कमी बजेट असतानाही उत्तम फीचर्ससह येतात. त्यांची किंमत 2000 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांचा स्टॉक देखील खूप वेगाने संपतो.

Advertisement

ही 2 हजार रुपयांच्या खाली असलेली स्मार्टवॉच आहेत

नॉईज कलरफिट पल्स ग्रँड स्मार्ट वॉच: नॉईज कलरफिट पल्स ग्रँड स्मार्टवॉचचे नाव देखील सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टवॉचच्या यादीत येते. त्याची किंमत 1,699 रुपये आहे. यात 60 स्पोर्ट मोडसह 1.69-इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय या घड्याळात आरोग्य आणि फिटनेसची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

फायर-बोल्ट निन्जा 3 स्मार्टवॉच: फायर-बोल्ट निन्जा 3 स्मार्टवॉचमध्ये 1.69-इंचाचा डिस्प्ले आहे. यात 60 स्पोर्ट मोड आणि अनेक आरोग्य वैशिष्ट्ये आहेत. IP68 रेटिंग असलेल्या या घड्याळाची किंमत 1,799 रुपये आहे.

Advertisement

Zebronics DRIP स्मार्टवॉच: Zebronics DRIP स्मार्टवॉचचाही सर्वाधिक विक्री होणाऱ्या यादीत समावेश आहे. यात ब्लूटूथ कॉलिंग फीचर्ससह 1.69-इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये अनेक मोड देण्यात आले आहेत. त्याची किंमत देखील 1,799 रुपये आहे.

boAt Wave Call Smartwatch: boAt Wave Call Smartwatch ची किंमत 1,999 रुपये आहे. यात 1.69 इंचाचा HD डिस्प्ले आहे. हे घड्याळ 150+ वॉच फेस, स्पोर्ट्स मोड आणि आरोग्य वैशिष्ट्यांसह येते.

फायर-बोल्ट फिनिक्स स्मार्टवॉच: फायर-बोल्ट फिनिक्स स्मार्टवॉचचे नाव देखील टॉप स्मार्टवॉचच्या यादीत येते. त्याची किंमत 1,999 रुपये आहे. या घड्याळात 1.3 इंचाचा डिस्प्ले आहे. या घड्याळात IP67 रेटिंग आणि 120+ स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

Advertisement