अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- शिवप्रतिष्ठाणचा रायगडावर सोन्याचे सिंहासन बसविण्याचा संकल्प राज्य व देशात पोचवायचा आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी जगावं कसं आणि मरावं कसं, हे दाखवून दिले आहे. त्यागाचा हा इतिहास कधीही विसरला जाणार नाही असे मत शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.
भिडे यांनी नुकतेच शनिशिंगणापूरला भेट देऊन स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील सोन्याच्या सिंहासनासाठी त्यांचे गावात व्याख्यान झाले.यावेळी ते बोलत होते.
भिडे यांनी शनिशिंगणापुरला भेट देवून दर्शन घेतले. यावेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त बाळासाहेब बोरुडे उपस्थित होते.
मंदिरातून कार्यक्रमस्थळी जाताना शिवप्रतिष्ठाणच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या नावाने जयघोष केला. सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी बंदोबस्त ठेवला होता