Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या सर्व बैठक रद्द करून अचानक शिर्डीला साईबाबांचे दर्शन करायला गेले. मंत्रिमंडळाच्या ठरलेल्या बैठका सोडून मुख्यमंत्र्यांनी थेट हेलिकॉप्टरने शिर्डी गाठली आणि साईबाबांचे दर्शन घेतले.
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईबाबांचे दर्शन घेऊनच थांबले नाहीत तर ते मुंबईकडे न जाता ते थेट सिन्नरमधील मिरगावात पोहोचले आणि त्यांनी एका ज्योतिष्याकडून भविष्य बघितल्याचे माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री देखील होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखी होते.
एकनाथ शिंदे यांचा दौरा हा नियोजित नव्हता मात्र त्यांनी अचानक शिर्डीवरून नाशिक मधील सिन्नर तालुक्यातील मिरगावात ताफा वळवला आणि तेथील एका ज्योतिष्याकडून भविष्य पहिले आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक ठरल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मिरगावमध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांच्या या मिरगाव दौऱ्याची अत्यंत गोपनियता ठेवण्यात आली होती.
मात्र माध्यम प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले. तिथे मुख्यमंत्री एका ज्योतिषी बाबाला भेटले आणि त्यांनी त्यांचं भविष्य जाणून घेतले, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
मुक्ख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिरगावात ज्या व्यक्तीला भेटले आहेत तो व्यक्ती भविष्य पाहतो अशी माहिती मिळत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या दौर्याची अत्यंत गोपिनीयता ठेवण्यात आली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्यक्तीला भेटून भविष्य पहिले का? तसेच या व्यक्तीला भेटून एकनाथ शिंदे यांनी का केले? याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत.