Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची बंद खोलीत चर्चा, आंबेडकर म्हणाले, भाजपसोबत आमची युती…

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रकाश आंबेडकर भेटणार होते मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला पोहोचले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली आहे. मात्र प्रत्क्ष आंबेडकर यांनी भाजपसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही. आमचे काही ऐतिहासिक मुद्दे आहेत. वैदिक हिंदू समाज रचनेबाबतं आमचे भाजपशी भांडण आहे. त्यावर त्यांनी आधी उत्तर दिले पाहिजे.

Advertisement

त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही. भाजपसोबत कोणी जात असेल तर आम्ही त्यांच्यासोबतही जाणार नाही. मग आमच्याकडे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय राहत नाही, असे स्पष्टपणे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

येत्या 20 तारखेचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी ठरला होता. प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडीबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीचं काय करायचं हे त्यांचं ठरत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचं काय होईल हे मला दिसत नाही.

Advertisement

काँग्रेसची एक टीम येऊन गेली. त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली. शिवसेनेसोबत अधिकृत राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेचे काही नेते मला भेटून गेले. पण 20 तारखेच्या कार्यक्रमानिमित्त भेटून गेले. त्यात राजकीय चर्चा नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.