अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- मुख्यमंत्री घरात बसून कारभार हाकतात, मंत्री मुंबई सोडायला तयार नव्हते. ज्यांची जबाबदारी होती त्यांनीच समाजाकडे पाठ फिरवली.
मदत फक्त केंद्र सरकारने करायची मग राज्य सरकार काय करणार असा प्रश्न उपस्थित करून आमदार विखे पाटील म्हणाले की, लसीकरणात राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगतात पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरीकांना मोफत लस उपलब्ध करून हे सांगायला विसरतात.
कोविड योध्दे समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सेवाभावी संस्थानी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळेच दुसऱ्या लाटेवर आपण सर्वजण मात करू शकलो, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले. बेलापूर येथे राधाकृष्ण विखे पाटील मित्र मंडळाच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सत्कार सोहळा झाला.
केशव अप्पा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी सभापती दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, सभापती नानासाहेब शिंदे, उपसभापती नितीन भागडे, बाळासाहेब तोरणे, गिरीधर आसने, पुष्पा हरदास आदी याप्रसंगी उपस्थित होते.
जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांचे निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबाबत बोलताना आमदार विखे म्हणाले, राणे यांची आक्रमक शैली आहे. सरकारने असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते. त्यांचेवर झालेली कारवाई सूडबुद्धीने केली असे वाटते.