जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुकलीचा अकस्मात मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- जंतनाशक गोळी दिल्यानंतर बीड जिल्ह्यातील प्रांजल अंकुश रक्ताटे ह्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बीड जिल्ह्यात आष्टी येथील लोणी सय्यद मीर या गावात ही घटना घडली आहे. याबाबत प्रांजलचे काका भाऊसाहेब रक्ताटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ”लोणी सय्यद मीर या गावात जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र आहे.

ते बंद असल्याने जंतनाशक गोळ्या गावातील मारूती मंदिरात आशासेविकांच्या माध्यमातून वाटण्यात आल्या. मुलांच्या पालकांच्या हाती गोळ्या देऊन घरी गेल्यावर मुलांना द्या, असे सांगण्यात आले.

परंतु या गोळ्या कशा घ्यायचे हे सांगण्यात आले नाही. गोळ्या घरी घेऊन आल्यावर प्रांजल हिला पूर्ण गोळीतील अर्धी गोळी दिली. तिला गोळी दिल्यानंतर ती जमिनीवर कोसळली.

तिने अंग सोडून दिले. त्यानंतर तिला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिथे उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24