चित्रा वाघ पुरुषांना ब्लॅकमेल करतात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती निश्चित मानली जात आहे.

पण निवड होण्यापूर्वीच अध्यक्षपदावरुन राष्ट्रवादी विरुद्ध भाजप महिला नेत्यांमध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राणवाला मदत करणारी शूर्पणखा त्याठिकाणी बसवू नका असं ट्विट केलं.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांची अवस्था म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी झालेली आहे.

जोरजोरात उड्या मारायच्या आणि द्राक्षाच्या घडापर्यंत उडी जात असतानाच द्राक्ष आंबट आहे असं म्हणायचं असा टोला विद्या चव्हाण यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज राहिल्या असत्या तर त्यांना आज काय काय पदं मिळाली असती याची त्यांना आठवण झाली की त्यांना वाईट वाटतं.

आणि म्हणून कोणाला तरी शूर्पणका म्हणायचं. आता शूर्पणखा काय वाईट होती का? ती पण एक महिला होती. त्यामुळे एका महिलेने दुसऱ्या महिलेला असं बोलणं बरोबर नाही, असं उत्तर विद्या चव्हाण यांनी दिलं आहे.

त्यांच्या आतापर्यंतच्या प्रेस कॉन्फरन्स बघितल्या तर त्या सर्रास ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरु आहे. आणि हे तंत्र त्यांना चांगलंच अवगत झालं आहे. भाजपाच्या एका आमदाराला ब्लॅगमेलिंग करण्याच प्रयत्न त्यांनी केला होता.

त्या जेव्हा महिला आयोगाच्या सदस्या होत्या आणि त्यांना त्यातलं कळायला लागल्यानंतर त्यांनी हा प्रकार सुरु केला असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. आज बरं वाटतं कारण त्या दुसऱ्यांवर आरोप करतायत. पण भाजपाच्या आमदारांवर पण त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले.

याला बघून घेते, त्याला बघून घेते, अशा प्रकारच्या धमक्या त्या देतात. हे असे प्रकार थांबले पाहिजेत असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत असा सल्लाही विद्या चव्हाण यांनी दिला आहे.