Sushama Andhare : “चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हावं”; सुषमा अधारेंनी डिवचलं

Sushama Andhare : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चर्चा आता पुन्हा होऊ लागली आहे. त्याच कारण म्हणजे भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांची नरमती भूमिका. चित्रा वाघ यांना काल पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारले असता त्या चांगल्याच भडकल्याचे दिसले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर कडवी टीका केली आहे. तसेच त्यांनी हर हर महादेव चित्रपटावर देखील टीका केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्यावरही अंधारे यांनी भाष्य केले आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, संजय राठोड आणि पुजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांनी आता संजय राठोड यांची माफी मागावी, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे, तर भावना गवळी जशा नरेंद्र मोदी यांच्या दीदी झाल्या, तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची दीदी व्हावं अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Advertisement

सुषमा अंधारे यांनी शरद पवार यांच्यावरील टीकेलाही उत्तर दिले आहे त्या म्हणाल्या, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, रामदास कदम, अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते मातोश्रीवर जीव ओवाळून टाकण्याची भाषा करायचे ते, आता मातोश्रीविरोधात झाले आहेत.

त्यांच्यावर ही जादू कुणी केली आहे, तर ही जादू देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे. शरद पवार हे राजकारणातील जादूगार नाहीत, तर देवेंद्रजी खरे जादूगार आहेत. ज्यांनी मातोश्रीसाठी जीव देणाऱ्या लोकांना मातोश्री विरोधात केले आहे.

चित्रा वाघ यांना काल पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण आत्महत्या प्रश्नाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्या चांगल्या भडकल्या, न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हू ना न्यायालय में. आप मुझको मत सिखाईये अशा शब्दात पत्रकारांना चांगलाच झापलं.

Advertisement

तसेच पुढे पत्रकार परिषदेतून काढता पाय घेताना म्हणाल्या, असल्या पत्रकारांना बोलवू नका माझ्या पत्रकार परिषदेला. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात असे म्हणत चित्रा वाघ पत्रकार परिषदेमधून निघून गेल्या.