अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- चित्राताईंचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत, नवीन वसुली मंत्री कोण?
अहो ताई… भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की, अंलगट आलं की पुन्हा पवारसाहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत हे म्हणायची वेळ येईल.
थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा… असे टोला असा खोचक टोमणा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन चित्रा वाघ यांना लगावला.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात हायकोर्टानं आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती त्यावर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.
चाकणकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लगावला आहे. राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केलेल्या या दोन्ही महिला नेत्या, राजकारणात आता सातत्याने एकमेकांविरुद्ध लढताना दिसतात.
परमबीर सिंग यांच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टानं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निकाल दिला.
त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.