Cholesterol Control Tips : उच्च कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवायची? तर आजपासून आहारातुन हे 5 पदार्थ काढून टाका; जाणून घ्या कोणते

Cholesterol Control Tips : जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला हे 5 पदार्थ तुमच्या आहारातून काढून टाकण्याचा सल्ला देणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये सर्वप्रथम बिस्किट येते. बिस्किट ही एक अशी गोष्ट आहे जी आपण नेहमी खातो पण त्याच्या वाईट परिणामांकडे लक्ष द्यायला विसरतो. वास्तविक, यात ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील खराब कोलेस्टेरॉल वाढते.

जास्त प्रमाणात पिवळे लोणी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते, कारण बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकबंद बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. या ऐवजी पांढरे लोणी खाल्ले तर आरोग्य चांगले राहील.

Advertisement

यामध्ये तेलकट पदार्थ न खाण्याचाही सल्ला दिला जातो. कोलेस्टेरॉल वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर यासाठी समोसे, फ्रेंच फ्राईज, चिप्स यांसारखे पदार्थ खाणे बंद करा.

लाल मांस हे प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहे यात शंका नाही, परंतु यामुळे शरीरात चरबी वाढते, विशेषत: कॅन केलेला मांस अधिक धोकादायक आहे.

आपल्या शरीराला उर्जा मिळण्यासाठी नैसर्गिक साखर खाणे खूप आवश्यक आहे, परंतु जर तुम्ही जास्त गोड पदार्थ (स्वीट डिश) खाल्ले तर नक्कीच आरोग्य बिघडते आणि उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.

Advertisement