मराठा आरक्षणप्रकरणी सरकारला चोळी बांगडीचा आहेर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,  9 मे 2021 :- गेल्या ३५ वर्षांचा प्रदीर्घ लढा, लाखोंच्या संख्येने, शांततेत निघालेले मूक मोर्चे, यानंतर तत्कालीन युती सरकारने मराठा समाजास आरक्षण जाहीर केले.

मात्र आरक्षणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेविरोधात, महाविकास आघाडी सरकारला, हे आरक्षण टिकवता आले नाही,

असा आरोप करीत छावा सरकारला चोळी बांगडीचा आहेर पाठवला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिली.

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने, केंद्र व राज्य सरकारला प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत साडी, चोळी व बंगडीचा आहेर देण्यात आला.

यावेळी छावाचे जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे, प्रदेश संघटक सुभाष जंगले, तालुकाअध्यक्ष नीलेश बनकर शेतकरी आघाडीचे विजय सलालकर,

शहर अध्यक्ष शरद बोबले, शाखा अध्यक्ष दत्ता कसबे, संघटक अक्षय पटारे, बाळासाहेब उंडे, अशोक अभंग, दौलत गायकवाड उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24