अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात गुन्हेगारी बोकाळली आहे. दरदिवशी खून, मारहाण, जबरी चोरी, दरोडा आदी गुन्हेगारी घटना जिल्ह्यात घडू लागल्या आहेत.
यामुळे जिल्ह्याची प्रतिमा गुन्हेगारी स्वरूपाची झाली आहे. नुकतेच शहरात एकाने जुन्या वादातून दुसऱ्यावर थेट चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान हा धक्कादायक प्रकार कोठला परिसरातील घासगल्लीमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी जखमी मोहसिन बदरूद्दीन खान (वय 35 रा. कोठला) यांनी फिर्याद दिली आहे.
त्याच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी मयनोदिदन ऊर्फ मन्या अब्बास पठाण, साबीर अब्बास पठाण, साबीरची पत्नी (नाव माहिती नाही, सर्व रा. घासगल्ली, कोठला) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांची आई घासगल्ली येथून किराणा दुकानात जात असताना मन्या याने मागील भांडणाच्या कारणातून फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली.
झालेल्या प्रकरणाबाबत फिर्यादी हे मन्या व इतरांना जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी चॉपरने फिर्यादीवर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या हल्ल्यात फिर्यादी यांच्या गालावर व ओठावर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक इडेकर करीत आहे.