वीजबिल वसुलीविरोधात नागरिक आक्रमक; महावितरणाविरुद्ध केली निदर्शन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-गेली वर्षभर कोरोना या महाभयंकर संकटात सापडलेला शेतकरी अवकाळीमुळे आधीच हतबल झाला होता.

आर्थिक उत्पन्न घटल्याने हवालदिल झालेला बळीराजा महावितरणच्या सक्तीच्या वीजबिल वसुलीविरुद्ध आक्रमक झाला आहे.

राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे विजबिलाच्या पठाणी वसूलीमुळे शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात घोषणाबाजी करून संताप व्यक्त केला.

कोंढवड येथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महावितरणाने रोहित्र बंद करून विजबिल वसूलीसाठी वेठीस धरले आहे.

उन्हाची तिव्रता वाढल्याने चारापिकी करपू लागले आहे. अवकाळी पावसाने व गारपिटीने रब्बी पुर्ण उध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

महावितरणने याबाबत भुमिका बदलावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. महावितरणने विजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद केले.

चारा पिके जळाली, रब्बी पुर्णपणे जमिनदोस्त झाली. या सर्व संकटाशी शेतकरी सामना करीत आहे.

महावितरणच्या या सुलतानी कारभाराने जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

त्यामुळे तात्काळ रोहित्रांची विजजोडणी करावी, अन्यथा, शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24