अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार संचारबंदी उल्लंघन, विनामास्क, सुरक्षित अंतर न पाळणे,
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मंगल कार्यालयमध्ये नियमांचे उल्लंघन अशा 90 हजार 249 केसेस करून 1 कोटी 52 लाख 24 हजार 317 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.
तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां 26 हजार 856 जणांवर गुन्हे दाखल झाले असून यामध्ये यामध्ये 31 हजार 148 आरोपी आहेत.
नागरिकांनी दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे.
विनाकारण आवश्यकरित्या रस्त्यावर फिरू नये. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे. मास्कचा वापर करावा.
सोशल डिस्टंसिंग पाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
मात्र नागरिकांची बेफिकीरी अद्यापही कायम असल्याचे वरील आकडेवारीतून पुन्हा एकदा स्पष्ठ होत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.