पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे कुकडी कालवा गेटवरच आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- श्रीगोंद तालुक्यातील कुकडी कालव्यालगत असणारा मोहरवाडी तलाव कोरडा पडल्याने कोळगावकरांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते.

यामुळे संतप्त गावकऱ्यांनी कुकडी कालवा गेटवरच आंदोलन केले. मात्र तरीही प्रश्न सुटला नाही दरम्यान आंदोलनस्थळी झेडपी सदस्य अनुराधा नागवडे आल्या आणि त्यांच्या मध्यस्तीने कुकडीचे पाणी मोहरवाडी तलावात सुरु झाले.

दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात कोळगाव येथील कोविड सेंटरला सुध्दा पाणी मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या कोळगावकरांनी आज कुकडी गेटवर आंदोलन केले. दरम्यान तेथे अनुराधा नागवडे आल्या व त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केली.

कर्जत हद्दीत जे ६५० क्युसेक्स पाणी द्यायचे आहे. त्याला बाधा न येता काही पाणी मोहरवाडी तलावात सोडून पिण्याचा प्रश्न मिटवा, त्यानंतर अधिकाऱ्यांनी काही पाणी मोहरवाडीला सुरू केले.

जलसंपदा विभागाला त्रास होईल असा कुठलाही पवित्रा आंदोलनकांनी घेतला नाही. यात जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांसह इतर नेत्यांनी चांगली भूमिका घेतल्याने पाणी प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती अनुराधा नागवडे यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24