अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कर्जत तालुक्यातील भांबोरा परिसरामध्ये चोरांनी धुमाकूळ घातला आहे. भांबोरा (सिद्धटेकफाटा) येथील विठ्ठल कदम यांच्या घरी बुधवारी (दि.१२) सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला.
यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भांबोरा परिसरामध्ये राहणारे विठ्ठल कदम यांना दरोडेखोरांनी पिस्तूल, चाकूच्या साहाय्याने धमकावून दागिने, रोख रक्कम व मोबाइल घेऊन गेले.
जाताना दरोडेखोरांनी कदम परिवारास घरामध्ये बंद केले. लगेच दुसऱ्या दिवशी दादासाहेब भगवान बळे यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
तसेच दुसऱ्यादिवशी गणेशवाडी येथे चोरी करण्याचा चोरांचा प्रयत्न फसला. तसेच सिद्धटेक येथील मोटारसायकल चोरून नेत असताना चोरास भांबोरा येथील युवकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. नागरिक रात्रीचे जागून पहारा देत आहेत. दरम्यान भांबोरा येथील दरोड्याचा तपास सुरू आहे.
भांबोरा-सिद्धटेक परिसरामध्ये रात्रीची पोलीस गस्त वाढवणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.