आठवडे बाजारातून पैसे पाळवणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी बेदम चोपले!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात रोज चोरी लुटमारीच्या घटना घडत आहेत. मात्र पैशांची चोरी करून पळत सुटलेल्या दोघा चोरट्यांची नागरीकांनी पकडून येथेच्छ धुलाई केल्याची घटना तालुक्यातील साकूर येथील आठवडे बाजारात घडली.

साकूर येथील रामभाऊ खेमनर हे बँकेतून पैसे काढून घरी जात होते. आठवडे बाजारातून जात असताना अचानक तिघा चोरट्यांनी त्यांच्या कडील पैसे हिसकावून घेतले.

हे पैसे घेऊन चोरटे पळून जात असताना खेमनर यांनी आरडाओरड केली. नागरीकांनी पाठलाग करुन यातील दोघा चोरट्यांना पकडले.

यातील एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. पकडलेल्या दोघा चोरट्यांची नागरीकांनी चांगलीच धुलाई केली. याबाबत घारगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी साकूर येथे येऊन या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले. आरोपी गिरीज भगवान भोसले (रा. औरंगाबाद रोड, नगर) व चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल वायाळ करत आहेत

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24