अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन गावपातळीवर कोविड सेंटर सुरु करत आहे. जेणेकरून रुग्नांना योग्य उपचार मिळावे व त्यांचे प्राण वाचावे.
मात्र कर्जत मध्ये एक अनोखाच प्रकार पाहायला मिळाला आहे. कोविड सेंटर सुरु होणार असल्याची माहिती समजताच नागरिक आक्रमक झाले आहे.
\ याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत शहरातील प्रभातनगर परिसरात काेविड सेंटर सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा येथील नागरिकांनी मुख्याधिकारी, तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे शहरातील प्रभातनगर येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशी माहिती येथील रहिवाशांना मिळाली.
त्यानंतर प्रभातनगर येथील रहिवाशांची बैठक झाली. प्रभातनगर हा रहिवासी असलेला भाग आहे. यामुळे या परिसरात खासगी इमारतीत किंवा कोणत्याही मंगल कार्यालयात कोरोनाचे कोविड सेंटर सुरू करू नये,
असा बैठकीत सूर निघाला. या परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चार जण दगावले आहेत. त्यामुळे अगोदरच यामुळे भागातील रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यामुळे येथे कोविड सेंटर सुरू करू नये असे निवेदनात म्हटले आहे.