आकडेवारीमधील वाढीनंतर नागरिक झाले जागरूक; लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-गेल्या काही दिवसापासून राहाता तालुका करोनाचा हॉटस्पॉट बनला असून सर्वाधिक रूग्ण शिर्डी, राहाता व लोणीत सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राहाता पालीकेने सात दिवस शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.

राहाता, साकुरी व पिंपळसमध्ये केलेल्या सात दिवसाच्या लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद मिळाला असून सर्वच व्यवसाय, हॉटेल, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले. करोनाच्या पार्श्वभुमीवर राहाता पालिकेने आजपासून शहरात औषध फवारणीस सुरूवात केली असून

एकाच वेळी सर्वत्र औषधाची फवारणी करावी, अशी नागरिकांसह सर्वच प्रभागातील नागरिक मागणी करीत आहे. त्यादृष्टीने पालीकेने नियोजन करण्याची गरज असून एकाच ट्रँक्टरद्वारे फवारणी करत

राहील्यास संपुर्ण शहर व परीसरात फवारणीसाठी पंधरा दिवस लागतील. तेव्हा मुख्याधिकारी व पालीका प्रशासनाने योग्य नियोजन केले तरच लॉकडाऊन केल्याचा फायदा होईल. राहाता तालुक्यात तर कोरोनानाने हाहाकार केला होताच

यामुळे सावध भूमिका बाळगत लगत असलेल्या साकुरी व पिंपळस ग्रामपंचायतींनीही खबरदारी घेत दोन्ही गावे सात दिवस लॉकडाऊन केली असून मंगळवार 30 मार्च ते 5 एप्रील या काळात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.

या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले असून पट्रोल पंपही सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 5 ते 7 या वेळेतच चालू राहणार असल्याने विनाकारण होणार्‍या गर्दीवर बर्‍या प्रमाणावर बंधने आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24