पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना नागरीकांनी रंगेहाथ पकडले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच आता महिला चोर देखील सक्रिय झाल्याची घटना श्रीरामपूर मध्ये घडली आहे.(women arrest)

नुकतेच श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सहा मधील हनुमान मंदिरासमोरील एका बॅग हाऊसच्या दुकानात असताना फिर्यादी महिला मंदाबाई देवगुडे,

यांच्या हॅंड बॅगची चैन उघडुन त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना फिर्यादी व नागरिकांनी रंगेहाथ पकडले आहे.

याप्रकरणी मंदाबाई देवगुडे यांच्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी रंजना गायकवाड, (वय ४५), व पूजा रोकडे, (वय ३५) श्रीरामपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Ahmednagarlive24 Office