ग्रामीण भागातील नागरिकांनो घराबाहेर पडण्यापूर्वी ‘ही’ बातमी वाचा.. अन्यथा  ..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना आता परत एकदा रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रूग्णसंख्येमुळे महसूल व पोलिस प्रशासन सतर्क झाले असून

आता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे. या अनुशंगाने जिल्हा प्रशासनाच्या पार्श्वभूमीवर आता तालुका प्रशासनाने देखील कडक पावले उचलली असून तालुक्यातील प्रत्येक गावाखेड्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.

यासाठी तहसीलदार उमेश पाटील यांनी आठ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. ग्रामीण भागात अनेकजण विनामास्क व विनाकारण भटकत असतात त्यामुळे आता अशी भटकंती करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाणार आहे.तहसीलदार उमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी दुकानांमध्ये गर्दी करणारे, वेळेचे पालन न करणाऱ्या आस्थापना, तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार रविवारी सकाळ पासूनच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न करणारे नागरिक व दुकानादारांवर भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली.

यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये धडक कारवाई करून सुमारे साडेबत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात तालुक्यातील जखणगाव, हिंगणगाव, वडारवाडी, नागरदेवळे, बुऱ्हाणनगर, दरेवाडी, वाकोडी, पिंपळगाव माळवी या गावात ही कारवाई कली.

अहमदनगर लाईव्ह 24