‘ही’ अट पूर्ण केल्यास मिळणार ४५ वर्षे वयाच्या नागरिकांना लस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गुरुवारपासून (१ एप्रिल) देशातील कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.

आता ४५ वर्षांपुढील नागरिकांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी पात्र नागरिकाचे वय हे १ जानेवारी २०२१ ला ४५ वर्षे व्हायला हवे.

तसेच १ जानेवारी, १९७७ आधी या नागरिकाचा जन्म झालेला असायला हवा. तुमचा जन्म जर या तारखेच्या आधी झाला असेल तरच तुम्हाला लस मिळणार आहे.

काही दिवसांनी सरकार ही अट काढून टाकण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरु झाले होते.

तेव्हा पहिल्या टप्प्यात कोरोना वॉरिअर्सना लस टोचली गेली. त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना लच टोचण्यात येत होती.

यानंतर सरकारी कर्मचारी, गंभीर आजार असेल्यांसाठी ही वयाची अट शिथिल करण्यात आली होती. दरम्यान लस टोचलेल्याचे सर्टिफिकेट न मिळाल्यास १०७५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार देता येणार आहे.

हे सर्टिफिकेट डिजिटलदेखील असणार आहे. महत्वाचे म्हणजे विमान प्रवासावेळी हे सर्टिफिकेट पाहिले जाणार आहे. अन्य ठिकाणीही हे सर्टिफिकेट लागू केले जाऊ शकते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24