बायपासचे काम मार्गी लावण्यासाठी नागरिकांचा ‘रास्तारोको’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-वाळूंज शिवारातील बायपास रोडचे अर्धवट अवस्थेतील काम मार्गी न लावल्यामुळे बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के याच्या नेतुत्वा खालीनगर सोलापूर महामार्गावर आज सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .

पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर बांधकाम विभागाच्या कार्यालयात येऊन आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला . वरिष्ठाशी चर्चा करुन या रस्त्याच्या दुरुस्ती साठी निधी इतर योजनेतून कसा मिळतो ते पाहू असे आश्वासन बांधकाम विभागाचे डि.एच. बांगर यांनी दिले. नगर तालुक्यातील वांळुज येथील बायपास रस्त्याचे काम आठ वर्षापूर्वी झाले .

मात्र गावाजवळील एक किमी रस्ता चे काम अपुर्ण ठेवले . या परीसरात मोठमोठाले खड्डे पडले आहे . धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे . अवजड वाहनामुळे पिकावर धुळ बसत आहे .पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. पिक काढण्यासाठी कामगार मिळत नाही . शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे . या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन होते मात्र याची दखल न घेतल्यामुळे सोलापुर महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला . शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उददेशाने बाहयवळण रस्ता करण्यात आता.

वाळूंज सोलापूर ते केडगांव पुणे रस्त्यापर्यंत राज्य सरकारणे सुमारे 3९ किलो मिटर रस्त्यावर सुमारे तीस कोटी रुपये खर्च करुन बाहयवळण रस्त्याच्या कामास डिसेंबर २००४ मध्ये प्रशासकीय मंजूरी दिली होती. बाहयवळण रस्त्याच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचे काम एका खाजगी एजन्सीला दिलेले होते. परंतू सदर एजन्सीने वेळकाढूपणा करुन रत्याचे काम पुर्ण न करता वाळूंज शिवारातील एक किलोमिटरचा रस्ता अपूर्ण ठेवला आहे.

या खाजगी एजन्सीकडून वेळकाढूपणा केला जात असल्याच्या तक्रारी वरीष्ठ पातळीवर करण्यांत आल्या आहेत. बाहयवळण रस्त्याच्या नियोजीत कामसाठी प्रकल्प आराखडा व अंदाजपत्रकाचे काम खाजगी एजन्सीला देण्यांत आले आहे. हे काम पूर्ण झालेल्या सांगण्यांत येते.

प्रत्यक्षात मात्र या एजन्सीकडून हा अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागातील कार्यालयाकडून देण्यांत आली आहे. सदर एजन्सीने वाळूंज पासून एक किलोमिटर अंतराचे काम अपुर्ण ठेवले .

अहमदनगर लाईव्ह 24