नागरिकांनी न घाबरता कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-दुसऱ्या लाटेमध्ये कोविडचा प्रसार खेड्या पर्यंत पोहोचला आहे. कोविडच्या अनाठाई भीतीपोटी अनेक जण घरीच उपचार घेत आहेत किंवा कोविडची चाचणी करून घेण्याचे टाळत आहेत.

वास्तविक ताप, खोकला, अंग दुखणे, सर्दी, थकवा अशी लक्षणे दिसतात तेव्हा कोविडची चाचणी करून घेणे व चाचणी पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक असताना तसे न करता घरातच थांबल्याने संपूर्ण कुटुंबच बाधित होताना दिसत आहेत.

तेव्हा लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरातच थांबून आपल्या प्रियजनांना संसर्ग न करता कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले पाहिजे, असे आवाहन आ.लहू कानडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. आ. कानडे यांनी पुढे म्हटले आहे,

दुसऱ्या लाटेमध्ये यामुळेच रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वास्तविक ८५ ते ९० टक्के रुग्णांना केवळ कोविड केअर सेंटर मध्ये थांबून तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेऊन बरे होता येते.

पहिला लाटेमध्ये हे सिद्ध झाले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघामध्ये शासनाच्या वतीने ५०० रुग्णांसाठी अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. तसेच देवळाली प्रवरा येथेही शासनाच्या वतीने पन्नास खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.

या दोन्ही ठिकाणी सकाळी नाश्ता, दोन वेळचे जेवण, शुद्ध व स्वच्छ पाणी आणि सरकारी डॉक्टरांच्या निगराणी खाली २४ तास नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीमध्ये उपचार केले जातात. या सर्व सेवा शासकीय कोविड सेंटरमध्ये मोफत दिल्या जातात.

शिवाय एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची किंवा अधिक उपचाराची आवश्यकता भासल्यास अशी सुविधा असणाऱ्या कोविड उपचार केंद्रामध्ये किंवा दवाखान्यामध्ये पाठवले जाते.

तेव्हा नागरिकांनी घाबरून न जाता व रिपोर्ट पॉझिटिव्ह असूनही घरातच थांबून आपल्या प्रियजनांना संसर्ग न करता कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले पाहिजे, असे आवाहन आ.लहू कानडे यांनी केले आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील आठ दिवसांपासून गावोगावच्या ग्राम सुरक्षा समित्या कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले होते.त्यानुसार गावोगाव विलगीकरण कक्ष तसेच बेलापूर,

पडेगाव, वळदगाव आदी गावात ग्रामपंचायत व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी मार्फतही कोविड केअर सेंटर सुरू झाले आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांनी स्वत: पुढाकार घेऊन शासनाने व स्वयंसेवी संस्थांनी मोफत औषधोपचार करणाऱ्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हावे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24